दिल्ली मेट्रो सुरू होण्याचे संकेत; शाळा तूर्त बंदच

delhi-metro
delhi-metro
Updated on

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटामुळे गेले पाच महिने ठप्प असलेली ‘दिल्ली मेट्रो’ची वाहतूक एक सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘अनलॉक-४’ मध्ये शारीरिक अंतराचे काटेकोर पालन करत पुन्हा सुरू करण्यास केंद्राकडून हिरवा कंदील दाखविण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र शाळा-महाविद्यालयांसह सर्व शिक्षणसंस्था बंदच राहणार आहेत. दारूचे बार उघडणार नसले तरी त्याच्या बाटल्या विकत घेऊन त्या नेण्यास (टेक अवे सेल) मद्यपींना परवानगी मिळणार आहे. स्थानिक उपनगरी गाड्यांची वाहतूक, एक पडदा सिनेमागृहे, छोट्या क्षमतेची सभागृहे आदींनाही परवानगी मिळण्याची चिन्हे आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे कोरोना महामारीतील अनलॉक-४ चे दिशानिर्देश लवकरच घोषित होण्याची शक्‍यता आहे. दिल्ली मेट्रो सुरू करण्यासाठी केंद्रावर मोठा दबाव आला आहे. मेट्रो गेले एक तप लाखो दिल्लीकरांची जीवनवाहिनी झाली आहे. रोज किमान ४८ लाख दिल्लीकर मेट्रोने प्रवास करतात. मात्र कोरोना लॉकडाउन व त्याआधी लागू केलेल्या जनता कर्फ्यूपासून म्हणजे २३ मार्चपासून मेट्रो ठप्प असल्याने मेट्रोला तब्बल १३००-१४०० कोटी रूपयांचा जबर फटका बसला आहे. दिल्ली मेट्रो ही केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या म्हणजेच मोदी सरकारच्या आधीन आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘अनलॉक’च्या काळात जूनपासून दिल्लीतील रेस्टॉरंट, हॉटेल, स्थानिक बाजारपेठा व बससेवेसह अन्य अनेक सेवा सुरू झाल्या तरी, मेट्रो सुरू करण्याचा निर्णय होत नव्हता. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मेट्रो सुरू करण्याबाबत केंद्राला अनेक पत्रेही लिहिली होती. अनलॉक काळात सार्वजनिक व्यवहार एकेक करून खुले करण्यात येत आहेत. कोरोना आगामी किमान वर्ष-सहा महिने तरी भारतातील मुक्काम हलविणार नाही असे संकेत खुद्द सरकारी यंत्रणांकडून मिळत असल्याने टाळेबंदी किती काळ चालू ठेवायची याचा ठोस निर्णय घेणे केंद्राला भाग आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुरवातीला मर्यादित सेवा
मेट्रोबाबत दिल्लीकरांकडून येणाऱ्या जबरदस्त दबावाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकार आता मेट्रो सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरवातीला मेट्रो सेवा फक्त अत्यावश्‍यक सेवा व सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच सुरू होईल. डब्यांमध्ये एका आड एक आसनावर प्रवासी बसतील व कोणीही उभे रहाणार नाही. सोशल डिस्टन्सिंग व इतर आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करूनच दिल्लीकरांना मेट्रोतून तूर्तास प्रवास करावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com