esakal | निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीची तारीख ठरली; पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

delhi nirbhaya case third death warrant against four guilty patiala house court

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याविरोधात आरोपींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली होती.

निर्भया प्रकरणातील आरोपींच्या फाशीची तारीख ठरली; पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Delhi Nirbhaya Case : दिल्लीत 2013मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना आता येत्या 3 मार्चला फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टानं या संदर्भात वॉरंट काढले असून, आता फाशीच्या शिक्षेची अंमल बजावणी होणार आहे. या निर्णयावर मी फारशी खूष नाही. कारण इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागला. मला आशा आहे की, येत्या 3 मार्चला दोषींना फाशी दिली जाईल, अशा प्रतिक्रिया निर्भयाची आई आशा देवी यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याविरोधात आरोपींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दया याचिका दाखल केली होती. ही याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या याचिका दोषी आरोपींनी दाखल केल्या होत्या. कायद्यातील पळवाट म्हणून, प्रत्येक आरोपी वेगवेगळी याचिका दाखल करत होते. निर्भयाच्या बलात्कार प्रकरणात मुकेश सिंह, विनय शर्मा, अक्षय ठाकूर आणि पवन गुप्ता दोषी ठरले होते. या चोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असली तरी, त्याची अंमलबजावणी लांबत आहे. फाशीच्या अंमलबजावणीचे आदेश दिल्यानंतरही दोषी आरोपी पुन्हा कोर्टात दाद मागत असल्यामुळं शिक्षेच्या अंमलबजावणीला विलंब होत होता. आज, पटियाला हाऊस कोर्टानं या प्रकरणात नव्यानं फाशीची तारीख जाहीर केली आहे. 

गुन्हेगार रोज कायदेशीर पळवाट शोधत आहेत. त्यांच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. पण, कोर्टाकडून फाशीच्या शिक्षेची तारीख जाहीर झालेली नव्हती. आम्हाला प्रत्येक सुनावणीच्या वेळी आशा वाटते.
- आशा देवी, निर्भयाच्या आई

loading image
go to top