दिल्लीकरांना आता 24 तास पाणी पुरवठा? अरविंद केजरीवाल यांची योजना

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 26 September 2020

दिल्लीमधील पाणी पुरवठा करण्याची पद्धत आधुनिक देशांप्रमाणे असेल.

नवी दिल्ली- दिल्लीचे (Delhi)  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  (Arvind Kejriwal) यांनी पाणी पुरवठयाबाबत मोठी घोषणा केली आहे. लवकरच दिल्लीकरांना 24 तास पाणी मिळावे यासाठी योजना आणणार असल्याचं ते म्हणाले आहेत. शनिवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

रामलल्लानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद न्यायालयात; मशिद हटवण्याची मागणी

दिल्लीमधील पाणी पुरवठा करण्याची पद्धत आधुनिक देशांप्रमाणे असेल. सध्या 930 मिलियन गॅलन पाण्याचे उत्पादन होते. दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीला 176 लीटर प्रतिदिन पाणी उपलब्ध आहे. दिल्लीतील पाण्याची उपलब्धता वाढवली जाणार आहे. त्यासाठी उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सरकारसोबत चर्चा केली जात आहे. 930 मिलियन गॅलेनपैकी मोठ्या प्रमाणात पाणी चोरीला जाते. यासाठी आम्ही एक सल्लागार नेमणार आहोत, जेणेकरुन पाण्याचा एक एक थेंब वाचवला जाईल आणि पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल, असं अरविंद केजरीवाल पत्रकार परिषदेत म्हणाले. 

दिल्लीतील प्रत्येक घराला पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे ना, याची माहिती सल्लागार आम्हाला देईल. आम्हाला हे लक्ष्य पाच वर्षांमध्ये साध्य करायचे आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आताची आपली पद्धत फार जूनी आहे. येत्या काळात दिल्लीकरांना 24 तास पाणी मिळू शकेल. पाण्याचे खाजगीकरण होणार नाही याची हमी  मी देतो. मी स्वत: खाजगीकरणाच्या विरोधात आहे, असंही केजरीवाल म्हणाले आहेत. 

एका संशोधनानुसार अधिक घातक असू शकतं दुसऱ्यांदा पॉझिटीव्ह येणं

दरम्यान, दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं आहे. याआधी एका कार्यक्रमात बोलताना केजरीवाल म्हणाले होते की, दिल्लीने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पीकला पार केले आहे. दिल्लीत काही दिवसांपूर्वी मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत होती. मात्र, काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिल्लीत कमी झाल्याचं दिसून येत आहे. 

(edited by- kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi people will get 24 hours water supply said cm arvind kejriwal