शर्मांची जीभ कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा करणाऱ्या भीम सेनेच्या प्रमुखाला अटक

Delhi Police arrests Bhim Sena chief Nawab Tanwar
Delhi Police arrests Bhim Sena chief Nawab Tanwar esakal
Summary

तंवर यांनी नुपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) स्पेशल सेलनं भीम सेनेचे (Bhim Sena) प्रमुख नवाब सतपाल तंवर (Nawab Satpal Tanwar) यांना भारतीय जनता पक्षाच्या (BJP) निलंबित सदस्या नुपूर शर्मांची (Nupur Sharma) जीभ कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केल्याबद्दल अटक करण्यात आलीय. पोलिस उपायुक्त केपीएस मल्होत्रा ​​यांनी याला दुजोरा दिलाय.

पोलिसांनी सांगितलं की, 9 जून रोजी तंवर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 153A, 504, 506, 509 अंतर्गत विशेष सेल पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. 8 जून रोजी तंवर यांनी शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला 1 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. शर्मा ह्या मुस्लिम आणि पैगंबर मोहम्मद, तसेच जगभरातील भारतीयांचा अपमान करत आहेत, असंही म्हटलं होतं. दरम्यान, पोलिसांनी तवंर यांना गुरुग्राममधून अटक केलीय.

Delhi Police arrests Bhim Sena chief Nawab Tanwar
'2032 पर्यंत सैन्यात 50 टक्के 'अग्निवीर' असणार, दरवर्षी दीड लाख तरुणांची होणार भरती'

दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि इतर 30 हून अधिक जणांविरुद्ध सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मवर द्वेष पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी सांगितलंय की, द्वेषयुक्त संदेश पसरवणं, विविध गटांना भडकावणं आणि सार्वजनिक शांतता भंग करण्यासाठी हानिकारक परिस्थिती निर्माण करणं यासाठी विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com