दिल्लीत गुप्तचर विभागातील कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला गटारात

वृत्तसंस्था
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

गुप्तचर विभागात चालक म्हणून काम करत असलेले अंकित शर्मा हा सोमवार सायंकाळपासून बेपत्ता होता. अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह चाँदबाग भागातील एका गटारात सापडला. 2017 पासून ते गुप्तचर विभागात कार्यरत होता.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारानंतर चाँदबाग भागात आज (बुधवार) सकाळी गुप्तचर विभागातील एका कर्मचाऱ्याचा मृतदेह गटारात सापडला. गेल्या तीन दिवसांपासून त्यांचा शोध घेण्यात येत होता.

दिल्लीत सलग तीन दिवस आंदोलन झाल्यानंतर आज (बुधवार) धग कमी झालेली आहे. ईशान्य दिल्लीतील चार विभागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून आंदोलकांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या हिंसाचारामध्ये आत्तापर्यंत वीस जणांचा बळी गेला असून, ५६ पोलिस कर्मचाऱ्यांसह दोनशे लोक जखमी झाले आहेत. जाफराबाद-मौजपूर-सीलमपूर-गोकूळपुरी, कबीरनगर, कर्दमपूर या टप्प्यातील ब्रह्मपुरी, मौजपूर भागांत जाळपोळ, लुटालूट व दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. 

गुप्तचर विभागात चालक म्हणून काम करत असलेले अंकित शर्मा हा सोमवार सायंकाळपासून बेपत्ता होता. अखेर आज सकाळी त्यांचा मृतदेह चाँदबाग भागातील एका गटारात सापडला. 2017 पासून ते गुप्तचर विभागात कार्यरत होता. ते या भागातच राहण्यास होते. दिल्लीत हिंसाचारात मृत्यू झालेले हेड कॉन्स्टेबल रतन लाल यांचाही दगडफेकीत नव्हे तर गोळी लागून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Police recover IB officers body from drain in Chandbagh