'The Wire' विरोधात गुन्हा दाखल; अमित मालवीयांकडून अब्रुनुकसानीचा दावा

मालवीय यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
'The Wire' विरोधात गुन्हा दाखल; अमित मालवीयांकडून अब्रुनुकसानीचा दावा

नवी दिल्ली : बनावट कागदपत्रांद्वारे आपली प्रतिमा मलिन केल्याचा दावा करत भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 'दि वायर' या मीडिया कंपनीविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार, दिल्ली पोलिसांनी या कंपनी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालवीय यांनी 'द वायर' विरोधात फौजदारी आणि दिवाणी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. (Delhi Police register FIR against the Wire over Amit Malviya complaint)

'द वायर'चे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन, संस्थापक-संपादक सिद्धार्थ भाटिया, एमके वेणू आणि उपसंपादक तसेच कार्यकारी वृत्त निर्मात्या जान्हवी सेन यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कलम 420, 468, 469, 471, 500 तसेच भादंवि १२० बी आणि कलम ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'The Wire' विरोधात गुन्हा दाखल; अमित मालवीयांकडून अब्रुनुकसानीचा दावा
Twitter: पराग अग्रवालांच्या हाकालपट्टीबाबत मोठा खुलासा! ट्विटरच्या पदाधिकाऱ्यांमधील चॅट लीक

याप्रकरणी मालयवीय यांनी म्हटलं की, "मी 'द वायर' विरोधात केवळ फौजदारी प्रक्रिया सुरू करणार नाही तर त्यांच्यावर दिवाणी न्यायालयात नुकसान भरपाईसाठी दावाही करणार आहे. कारण त्यांनी माझी प्रतिष्ठा खराब आणि कलंकित करण्याच्या हेतूनं बनावट कागदपत्रे तयार केली आहेत"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com