esakal | मोठी बातमी! पाकच्या दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड; देशभरात करणार होते घातपात
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी! सहा दहशतवादी अटकेत; देशभरात करणार होते घातपात

मोठी बातमी! सहा दहशतवादी अटकेत; देशभरात करणार होते घातपात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या एका स्पेशल सेलला मोठं यश हाती लागलं आहे. पाकिस्तानमधील एका दहशतवादी मॉड्यूलचा दिल्ली पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या दोन दहशतवाद्यांसहित एकूण सहा लोकांना अटक करण्यात आली आहे. स्पेशळ सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी म्हटलंय की, स्फोटके तसेच इतर हत्यारे देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे. या दोन दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलं होतं.

दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की, संपूर्ण देशामध्ये बॉम्बस्फोट घडवून मोठा संहार घडवून आणण्याचा त्यांचा मोठा कट होता. यामधील सगळे आरोपी हे देशभरात मोठा हाहाकार माजवण्याच्या तयारीत होते. सध्या अटक करण्यात आलेल्या या आरोपींची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी म्हटलंय की, आम्ही कोटामधून समीर, दिल्लीमधून दोघांना आणि उत्तर प्रदेशमधून तिघांना अटक केली आहे. या सहापैकी दोघांना पाकिस्तानात मस्कटमार्गे नेण्यात आले जेथे त्यांना 15 दिवस एके -47 यासह स्फोटके आणि बंदुकांचे प्रशिक्षण देण्यात आले. दहशतवाद्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे की दहशतवाद्यांच्या टार्गेटवर नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सण होते. दिल्ली पोलिसांनी पुढे सांगितलं की, अंडरवर्ल्डमधून या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवण्यात आली आहे. या दहशतवाद्यांकडून आयईडी जप्त करण्यात आले आहेत. यातील दहशतवादी जान मोहम्म हा शेख हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे.

त्यांनी दोन गट केले होते. आणि यातील एक गट हा दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिमद्वारे चालवला जात होता. सीमा ओलांडून भारतात शस्त्रे आणण्याचे आणि त्यांना येथे लपवून ठेवण्याचे काम त्यांना देण्यात आले होते. दुसरी टीम हवाला मार्गे निधीची व्यवस्था करणार होती, अशी माहिती पोलिसांनी दिल्ली आहे.

अटक केलेल्यांनी सांगितलंय की त्यांच्या गटात 14-15 बंगाली भाषिक व्यक्ती आहेत ज्यांनाही कदाचित अशाच प्रशिक्षणासाठी घेतलं गेलं असेल. प्रथमदर्शनी असं दिसतंय की हे ऑपरेशन सीमापलिकडे जवळूनच कोऑर्डीनेट होत होतं.

loading image
go to top