

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे. उद्या, १६ ऑक्टोबर रोजी सीजेपीने दिल्लीतल्या सेंट्रल पार्कमध्ये ‘लहरा दो तिरंगा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने तरुण सहभागी होणार असल्याची माहिती होती. मात्र नवी दिल्ली नगरपालिका परिषदेने (NDMC) कॅनॉट प्लेस येथील ‘सेंट्रल पार्क’ १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.