सावधान! लसीकरण नोंदणीच्या फेक साईट्स झाल्यात अ‍ॅक्टिव्ह

सावधान! लसीकरण नोंदणीच्या फेक साईट्स झाल्यात अ‍ॅक्टिव्ह

दिल्ली : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची आकडेवारी देखील वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या अटोक्यात आणण्यासाठी प्रशासन पूरेपूर प्रयत्न करत आहे. कोरोना काळात ऑक्सिजन बेड, रेमेडिसिव्हिरच्या नावाखाली रुग्णांची आणि नातेवाईकांची फसवणूक होत असल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत. या फसवणूकीत आता सायबर क्राईमची देखील भर पडली आहे. कोरोनाच्या नावाखाली सायबर क्राईमदेखील वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांनी अशा फ्रॉडपासून सावध राहाण्याचे आवाहन करत फेक व्हॅक्सिन साईटसेच URL आणि फोटो ट्विट केले आहेत. (Delhi Police Tweet to Stay Alert from fake site of vaccination registration)

सायबर क्राईमला बळी पडलेल्या कोरोना रुग्णांच्या काही तक्रारी वाढत आहेत. CyPAD आणि दिल्लीतील वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी दिल्ली पोलिस जनजागृती करत आहेत. ऑक्सिजन किंवा औषध पुरविण्याच्या नावाखाली झालेल्या ऑनलाईन फसवणूकीची आकडेवारीची पडताळणी देखील केली जात आहे. तसेच नागरिक कोणतीही खात्री न करता ऑक्सिजन किंवा औषध पुरविण्याऱ्यांचा दावा करणाऱ्यांना ऑनलाईन पैसे पाठवत आहेत. त्यातच आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या नावाखाली सायबर क्राईम होत असल्याचे समोर आले आहे.

काही लोकांना SMS द्वारे फेक व्हॅ्सिन रजिस्ट्रेशनसाठी साईटची लिंक पाठवून क्लिक करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा फेक साईटवर क्लिक करु नका असे सांगत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन दिल्ली पोलिसांनी केले आहे. ''तुमची माहिती आणि पैसे सुरक्षित ठेवा, सतर्क राहा सुरक्षित राहा'' असे सांगत पोलिसांनी ट्विट केले आहे. कोरोना प्रतिंबधक लसीकरणासाठी फक्त https://cowin.gov.in किंवा CoWin/ArogyaSetu App वरुनच नोंदणी करा अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com