दिल्ली-एनसीआरची हवा पुन्हा एकदा 'विषारी' बनली आहे. राजधानीचे गॅस चेंबरमध्ये रूपांतर झाले आहे. उत्तर भारतात थंडी वाढत असताना प्रदूषणाची पातळीही झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सरकारला GRAP-4 अंतर्गत निर्बंध लादावे लागले आहेत. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील वायू प्रदूषण 'गंभीर पातळी' वर पोहोचले आहे.