
नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत शुक्रवारी मध्यरात्री व आज पहाटेपर्यंत चाललेल्या मुसळधार पावसामुळे झोडपून काढले. पाणी तुंबणे, वाहतुकीची झालेली कोंडी यामुळे दिल्लीत राखीपौर्णिमेच्या उत्साहावरही परिणाम झाला. एवढेच नव्हे तर हवाई सेवाही विस्कळित होऊन १०० अधिक उड्डाणे खोळंबली. दरम्यान, पावसामुळे घर कोसळून सात जण मृत्युमुखी पडल्याची दुर्घटनाही आज घडली.