दिल्लीत कोरोनाचा आलेख वाढताच; 24 तासात 1009 रूग्णांची भर

दिल्लीतील कोरोनाचा संसर्ग दर 5.7% वर गेला आहे.
Coronavirus
Coronavirus

नवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या 24 तासांत राजधानी दिल्लीमध्ये 1009 नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. तर, 314 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या राजधानीत सक्रिय रुग्णांची संख्या 2641 वर गेली आहे. तर, संसर्ग दर 5.7% वर गेला आहे.

Coronavirus
Kieron Pollard चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; निवृत्तीची मोठी घोषणा

दरम्यान, वाढत्या रूग्णांच्या पार्श्वभूमीवर येथे पुन्हा एकदा मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले असून, न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. आज पार पडलेल्या दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत यावर सखोल चर्चा करण्यात आल्यानंतर मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

शाळा बंद होणार नाहीत, नवीन SOP बनवणार

दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णसंख्येमुळे नुकत्याच सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, डीडीएमएच्या बैठकीत शाळा बंद केल्या जाणार नाहीत परंतु नवीन एसओपी अंतर्गत काम केले जाईल असे सांगण्यात आले आहे. बैठकीमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि रूग्णालयांमधील तयारी याबाबतही आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे बाजारपेठेतील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही काही पावले उचलली जाऊ शकतात.

Coronavirus
उन्हाच्या चटक्याने ‘खादी’ला मागणी वाढली; दरांमध्ये ५ टक्के वाढ

देशात कोरोनाची चौथी लाट नाही, डॉ. गंगाखेडकरांनी स्पष्टच सांगितलं

एकीकडे देशभरातील कोराना रूग्णसंख्या कमी झाल्याने अनेक ठिकाणचे कोरोना निर्बंध (Corona Restriction) जवळपास मागे घेण्यात आले आहे. तर, दुसरीकडे दिल्लीसह पाच राज्यातील कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत काहीशी वाढ दिसू लागली आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) पुन्हा एकदा मास्क (Mask) वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सर्वांमध्ये ICMR चे माजी शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर (Raman Gangakhedka) यांनी अतिशय महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे. (Dr. Raman Gangakhedkar On Corona New Wave)

Coronavirus
एकदा आवर्जून भेट द्यावी असा तामिळनाडूमधील थिरुमलाई नायक पॅलेस

देशातील काही भागांमध्ये कोरोना बाधितांची वाढती रूग्णसंख्या कोरोनाची चौथी लाट असल्याचे आतासध्याच्या आकडेवारीवरून तरी वाटत नाहीये. संपूर्ण जगाने BA.2 व्हेरिएंटचा जगभरातील लोकांवर परिणाम होत असल्याचे पाहिले आहे. मात्र, त्यानंतर आतापर्यंत कोरोनाचा कोणताही नवीन व्हेरिएंट समोर आलेला नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. (Corona New Variant)

परंतु, जे वृद्ध आहेत, ज्यांनी लस (Corona Vaccination) घेतलेली नाही, ज्यांना संसर्ग झाला आहे, त्यांनी सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करण आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मास्कचा वापर ऐच्छिक केल्यामुळे नागरिकांना महामारी संपल्याचे वाटू लागले आहे. मात्र, अद्याप कोरोना कायमचा संपलेला नसून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचेही गंगाखेडकर यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com