Dengue Cases : दिल्लीत एका आठवड्यात डेंग्यूचे २४७ रुग्ण आढळल्याने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue Cases in delhi

Dengue Cases : दिल्लीत एका आठवड्यात डेंग्यूचे २४७ रुग्ण आढळल्याने खळबळ

नवी दिल्लीः दिल्लीमध्ये डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. मागच्या आठवड्यात तब्बल २४७ रुग्ण आढळून आल्याची शासन दप्तरी नोंद झालीय.

सध्या जगावर कोरोनाचं संकट आहे. चीन, अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियासह काही देश कोरोना विषाणूच्या विळख्यात येत आहेत. भारत सरकारदेखील अलर्ट मोडवर आलेलं असून पंतप्रधानांनी राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंगसंदर्भात निर्देश दिलेत.

हेही वाचाः जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

त्यातच आता दिल्लीत डेंग्यूने डोकं वर काढलेलं आहे. आठवड्यात २४७ रुग्ण आढळून आलेले असून वर्षभरात ४ हजार ३६१ डेंग्यू रुग्णांची नोंद झालीय. तर ७ जाणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे.

दिल्ली महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार २०१७ मध्ये दिल्लीत कोरोनाचे ४ हजार ७२६ रुग्ण आढळून आले होते. तेच २०१८मध्ये २ हजार ७९८, २०१९मध्ये २ हजार ३६, २०२० मध्ये १ हजार ७२ आणि २०२१ मध्ये ९ हजार ६१३ रुग्ण आढळून आले होते.

हेही वाचा: Year Ender 2022 : श्रद्धाचे 35 तुकडे ते भट्टीत बापाला जाळले... 'या' 7 घटनांनी देश हादरला

गेल्या काही वर्षांत कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचा प्रसार वेगाने झाला आहे. या आजारात प्लेटलेट्स कमी होण्याचा धोका देखील आहे. लोकांचा असा समज आहे की, डेंग्यू आणि कोरोना एकत्र होऊ शकत नाहीत. पण, हा समज खोटा ठरू शकतो. डॉक्टरांचे असे मत आहे की, हे दोन्ही आजार एकाचवेळी एका व्यक्तीला होऊ शकतात.

कोरोना काळात रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने रक्तातील पेशी कमी होऊन डेंग्यूचा त्रास अनेकांना झाला असेल. सध्या पावसाळा संपला असला तरी हिवाळ्याची चाहुल अनेक आजारही सोबत घेऊन येते. सध्या तरी दिल्लीवर डेंग्यूचं संकट घोंगावत आहे.

टॅग्स :delhiDengue