नवी दिल्ली : दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालिदला बुधवारी कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने उमर खालिदची सात दिवसांच्या अंतरिम जामिनावर सुटका केली आहे. न्यायालयाने उमर खालिदला 28 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. उमर खालिदला त्याच्या चुलत भाऊ आणि बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.