अमित शहांना गृहमंत्रीपदावरून हटवा : सोनिया गांधी

वृत्तसंस्था
Thursday, 27 February 2020

अमित शहांकडून कर्तव्यात कसूर करण्यात आली. अमित शहांना मंत्रिपदावरून हटवा. अमित शहा निष्क्रीय ठरले. दिल्लीत हिंसाचार सुरु असताना केंद्र आणि राज्य सरकार मूकदर्शक बनले.

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत हिंसाचार सुरु असताना कर्तव्यात कसूर करण्यात आली. त्यांना मंत्रिपदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केल्याचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) दिल्लीत झालेल्या हिंसाचारात 34 जणांचा मृत्यू झाला असून, शेकडो जण जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. सोनिया गांधींकडून काल पत्रकार परिषदेत टीका केल्यानंतर आज (गुरुवार) काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन त्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. काँग्रेस नेत्यांनी पत्रकार  परिषद घेऊन केंद्र सरकारवर दंगल रोखण्यात असमर्थ ठरल्याचे म्हटले आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, की अमित शहांकडून कर्तव्यात कसूर करण्यात आली. अमित शहांना मंत्रिपदावरून हटवा. अमित शहा निष्क्रीय ठरले. दिल्लीत हिंसाचार सुरु असताना केंद्र आणि राज्य सरकार मूकदर्शक बनले. दिल्लीत राजधर्माचं पालन झाले नाही, मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi Riots Congress interim president Sonia Gandhi former Prime Minister Dr. Manmohan Singh meet President Ramnath Kovind