esakal | दिल्ली: वकीलाच्या वेशात कोर्टात येऊन गँगस्टरची हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

court

दिल्लीत रोहिणी कोर्टात दोन गटात मोठी धुमश्चक्री झाली. शुक्रवारी दुपारी झालेल्या या गोंधळात गोळीबारही झाला असून तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितलं जात आहे. मोस्ट वाँटेड गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोर हे वकीलाच्या पोशाखात आले होते. शूटआऊटमध्ये दोन्ही हल्लेखोर ठार झाले आहेत.

दिल्ली: वकीलाच्या वेशात कोर्टात येऊन गँगस्टरची हत्या

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिल्लीच्या रोहिणी कोर्टात झालेल्या या थरारक घटनेत गँगस्टर गोगीची हत्या झाली आहे. रोहिणी कोर्ट क्रमांक दोन मध्ये वकीलाच्या वेशात काही गुंड आले आणि त्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. या गोळीबारात गोगीचा मृत्यू झाला. या गोळीबाराला प्रत्यूत्तर देताना पोलिसांनी देखील आरोपींवर गोळ्या झाडल्या. दिल्ली पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये दोन आरोपी ठार झाले आहेत. दोन टोळ्यांच्या वादातून ही घटना झाली असल्याचे समजते आहे. थेट कोर्टाच्या आवारातच अशी घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गँगस्टरवर हल्ला झाल्यानंतर कोर्ट परिसरात शूटआऊट झाले. यामध्ये हल्लेखोरांचा मृत्यू झाला आहे. एकूण चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर येत असून यात एक जितेंद्र आणि इतर दोघेजण हल्ला करणारे आहेत अशी माहिती मिळाली आहे. जितेंद्रला दोन वर्षांपूर्वी स्पेशल सेलने गुरुग्राममधून अटक केली होती. विरोधी गँगने जितेंद्रवर हल्ला केला असल्याचं म्हटलं जात आहे.

loading image
go to top