

नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत दोन दिवसांपासून असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या प्रकल्पांबाबत गृहमंत्री अमित शहांसह चार मंत्र्यांसोबत चर्चा केली. यात प्रामुख्याने राज्यातील पायाभूत प्रकल्पांसाठी केंद्राकडून अपेक्षित असलेली मदत आणि महाराष्ट्रात खत प्रकल्प सुरू करणे या मुद्द्यांचा समावेश होता.