Delhi News: दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आठ संशयितांना अटक, लाल किल्ल्यासह धार्मिक स्थळे लक्ष्य
Delhi Terror Plot: दिल्लीमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या कटात आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे संबंध आयएसआय आणि लष्करे तैयबा या संघटनांशी असल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानची गुप्तचर संघटना ‘आयएसआय’ आणि बांगलादेशातील कट्टरतावादी संघटनांच्या सूचनेवरून दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या आठ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.