दिल्लीत सापांच्या आठ नव्या प्रजातींचा शोध

दिल्लीतील सापांच्या संशोधनात २३ प्रजातींच्या एकूण ३२९ सापांची नोंद करण्यात आली. संशोधकांनी जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०२० दरम्यान दिल्लीतील ११ जिल्ह्यांत सापांचे हे संशोधन केले.
Snake
SnakeFile photo
Summary

दिल्लीतील सापांच्या संशोधनात २३ प्रजातींच्या एकूण ३२९ सापांची नोंद करण्यात आली. संशोधकांनी जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०२० दरम्यान दिल्लीतील ११ जिल्ह्यांत सापांचे हे संशोधन केले.

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत सापांच्या आणखी आठ प्रजातींचा शोध लावण्यात संशोधकांना यश आले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या संशोधकांनी पाच वर्षे अथकपणे परिश्रम करून या प्रजातींचा शोध लावला असून, त्यांचा दिल्लीतील सापांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे, राजधानीत आढळणाऱ्या एकूण सापांच्या प्रजातींची संख्या आता २३वर गेली आहे. हे संशोधन अमेरिकेतील ‘रेप्टाईल्स ॲंड ॲंफिबियन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. (Delhi University researchers finding eight more species of snakes)

दिल्लीतील प्राण्यांविषयीच्या ‘फौना ऑफ दिल्ली’ या पुस्तकातील १९९७ ची यादीही या सापांच्या शोधामुळे अद्ययावत करण्यात आली आहे, अशी माहिती दिल्ली विद्यापीठातील पर्यावरण विभागातील संशोधक गौरव बारहाडिया यांनी दिली.

Snake
'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

दिल्लीतील सापांच्या संशोधनात २३ प्रजातींच्या एकूण ३२९ सापांची नोंद करण्यात आली. संशोधकांनी जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०२० दरम्यान दिल्लीतील ११ जिल्ह्यांत सापांचे हे संशोधन केले. यात संशोधकांनी दिल्लीतील सार्वजनिक तसेच खासगी बागा, फार्म, मोकळ्या जमिनी, सरोवर आणि इतर जलस्रोंतामध्ये सापांचा शोध घेतला. निशाचर सापांचीही माहिती जमविण्यात आली. त्याचप्रमाणे, माहिती जमविण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया आणि इतर स्वयंसेवी संस्थांकडील सापांबाबतच्या माहितीचाही वापर करण्यात आला.

Snake
Yaas चक्रीवादळ घेणार रौद्र रुप; पूर्व किनाऱ्यावर नौदल सज्ज

दिल्लीतील सापांच्या नव्या प्रजाती

नानेटी (कॉमन ब्रोंझबॅक ट्री स्नेक), तस्कर (कॉमन ट्रिंकेट स्नेक), मांजऱ्या (कॉमन कॅट स्नेक), कवड्या (बॅरड वुल्फ स्नेक), मण्यार (कॉमन कुकरी), पट्टेरी मण्यार (स्ट्रिक्ड कुकरी), मांडूळ (कॉमन सॅंड बोआ) आणि फुरसे (सॉ-स्केल्ड वायपर)

दिल्ली हे सापांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे, कारण येथे अरवली पर्वतरांगेचा शेवटचा एक टप्पा विखुरलेला आहे, जो आता शहरातील जंगले किंवा उद्यानांच्या स्वरूपात तुकड्यांमध्ये आढळतो. त्यामुळे दिल्लीत घरात आणि आसपास सापांचे वास्तव्य आढळते. बहुतेक साप बिनविषारी आणि निरुपद्रवी असूनही गैरसमजातून त्यांची हत्या केली जाते. रस्त्यावरील अपघात, अधिवास संकटात येणे ही दिल्लीतील सापांपुढील आव्हाने आहेत.

- डॉ. चिराश्री घोष, दिल्ली विद्यापीठ

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com