Delhi Weather : हवामान बदलाचे असह्य चटके होणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Weather Updates

Delhi Weather : हवामान बदलाचे असह्य चटके होणार!

नवी दिल्ली : यंदाच्या उन्हाळ्यात मार्च ते मे महिन्यांदरम्यान देशाच्या राजधानीने उष्णतेच्या पाच लाटा अनुभवल्या. त्याचप्रमाणे, दिल्लीत विक्रमी ४९.२ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाचीही नोंद झाली. या वाढत्या उष्णतेचा दिल्लीतील कमी उत्पन्न व अनौपचारिक वस्तीत राहणाऱ्या निम्म्या लोकसंख्येला धोका असल्याचा इशारा जागतिक हवामान खात्याने दिला आहे. याबाबतचा अहवाल ‘युनायटेड इन सायन्स’ मध्ये प्रकाशित झाला आहे.

हवामान बदलामुळे प्रदीर्घ उष्ण हवामानात तब्बल ३० पटीने वाढ होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या अहवालानुसार, २०५० पर्यंत जगातील ९७० देशांतील १.६ अब्ज लोकांना तीन महिन्यांच्या सरासरी किमान ३५ अंशांपर्यंत पोचणाऱ्या तापमानाचा सामना करावा लागेल.

जागतिक तापमानवाढीला हातभार लावणारे हरितगृह वायू उत्सर्जन यापुढेही विक्रमी पातळीवर होत राहील. कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाउनमुळे जीवाश्म इंधनाच्या उत्सर्जनात तात्पुरती घट झाली होती. मात्र, ते आता पुन्हा कोरोनापूर्व पातळीवर गेले आहे. पॅरिस करारात ठरविलेले जागतिक तापमान २०३० पर्यंत दीड अंश तापमान कमी करण्याचे ध्येय गाठण्यासाठी हे उत्सर्जन कमी करण्याची गरज आहे.

हवामान बदलाचा वाढता धोका

  • वाढ पाचपट - नैसर्गिक आपत्तींत गेल्या ५० वर्षांतील

  • ११५ - जगभरातील दैनंदिन मृत्यू

  • २० कोटी डॉलर - दररोजचे नुकसान

अहवालातील ठळक मुद्दे

  • जागतिक हवामान खात्याच्या नोंदीनुसार गेली सात वर्षे सर्वाधिक जागतिक तापमानाची होती.

  • येत्या पाच वर्षांत १८५०-१९०० च्या तुलनेत वार्षिक जागतिक तापमान दीड अंश सेल्सिअसने अधिक असण्याची ४८ टक्के शक्यता

  • जगातील अब्जावधी लोकसंख्येच्या प्रमुख शहरांचा मानवनिर्मित उत्सर्जनात ७० टक्के वाटा

  • लॉकडाउनमध्ये तात्पुरती घट झाल्यानंतर हरितगृह वायू उत्सर्जन पुन्हा कोरोनापूर्व पातळीवर

Web Title: Delhi Weather Updates Climate Change Heat Increase World Meteorological Organization Report

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..