Arvind Kejriwal and Gajendrasingh Shekhawat
Arvind Kejriwal and Gajendrasingh Shekhawat

Delhi Flood : यमुना नदीच्या पाणीपातळीवरून राजकारण करू नये; केंद्रीय मंत्र्यांचा केजरीवालांना सल्ला

Published on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत यमुना नदी धोक्याच्या पातळीपेक्षा 3 मीटरवर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत अनेक भागात पुराचा धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचले असून मेट्रो सेवेवरही परिणाम झाला आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारच्या मंत्र्यांनी मदत आणि उपाययोजनांचा आढावा घेतला.

Arvind Kejriwal and Gajendrasingh Shekhawat
Eknath Shinde : देवेंद्रजींनी मला सांगितलं एकनाथजी CM व्हा, तुम्ही त्यांनाच कलंक म्हणता; शिंदेंचा हल्लाबोल

त्याचवेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत पूर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे मदतीचे आवाहनही केले आहे. तर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी दिल्लीत पुराचा धोका नसल्याचं सांगताना केजरीवाल यांनी पुराचे राजकारण करू नये, असा सल्ला दिला आहे.

Arvind Kejriwal and Gajendrasingh Shekhawat
Scholarship Exam Result : पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, एका क्लिकमध्ये पहा रिझल्ट

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले, "हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढली आहे. हथिनी कुंड बॅरेजमधून दिल्लीपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी 44-45 तास लागतात."

शेखावत म्हणाले, "दिल्ली सरकारने हे समजून घेतले पाहिजे की हथिनी कुंड हे धरण नसून बॅरेज आहे, पाण्याचा प्रवाह रोखण्याची त्याची क्षमता आहे, ज्याचा आम्ही पुरेपूर वापर करत आहोत." येत्या २४ तासांत पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात होईल. सध्या तरी दिल्लीला पुराचा धोका नाही. मुसळधार पावसाचे पाणी आता येत असले तरी लवकरच दिलासा मिळेल, असही त्यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com