गर्लफ्रेण्ड समजून महिला पोलिसाशी केले चॅटींग अऩ्...

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

गर्लफ्रेण्ड एकाने महिला पोलिसासोबत चॅटींग केले. चॅटींग दरम्यान प्रेमाच्या गुजगोष्टी करण्यात आल्या. एका अज्ञातस्थळी भेटायला बोलवल्यावर तो आनंदाने गेला.

नवी दिल्लीः गर्लफ्रेण्ड एकाने महिला पोलिसासोबत चॅटींग केले. चॅटींग दरम्यान प्रेमाच्या गुजगोष्टी करण्यात आल्या. एका अज्ञातस्थळी भेटायला बोलवल्यावर तो आनंदाने गेला. पण, घटनास्थळी गेल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुंडका भागामध्ये एक मोटार लुटण्यात आली होती. यामधील संशयीत आरोपी सोमवीर बाबत माहिती मिळाली होती. त्याचे कॉल रेकॉर्डस तपासण्यात आल्यानंतर तो एका मुलीशी तासन तास बोलत असल्याचे दिसून आले. यामुळे महिला पोलिसांनी त्याच्या प्रेयसीचे घर गाठले. तिला विश्वासात घेऊन तिचा मोबाईल ताब्यात घेतला. महिला पोलिसाने त्याच्याशी व्हॉट्सऍपवरून चॅटिंग सुरू केले. काही तास एकमेकांशी चॅटिंगवरून बोलणे सुरू होते. सोमवीर आपली मैत्रिण समजून बोलत होता. महिला पोलिसाने त्याच्याकडून माहिती काढून घेत त्याला एका अज्ञात ठिकाणी भेटायला बोलवले. सोमवीर घटनास्थळी आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, सोमवीरला ताब्यात घेतल्यानंतर त्याने मोटार लुटल्याची कबुली दिली. महिला पोलिसाने लढविलेल्या शक्कलीमुळे सोमवीरला पकडण्यात यश आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi youth chat with lady constable and robber arrested