esakal | डेल्टा प्लस कमी फैलावणारा; ‘इन्साकॉग’चा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जागतिक आरोग्य संघटनेने तिसऱ्या लाट जगात सुरू झाल्याचे स्पष्ट केल्याने चिंता करण्यासारखी स्थिती आहे.

डेल्टा प्लस कमी फैलावणारा; ‘इन्साकॉग’चा दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - कोरोना संसर्गाने देशात चोवीस तासातील ४० हजारांचा आकडा आज पुन्हा ओलांडला आहे. अशा परिस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेने तिसऱ्या लाट जगात सुरू झाल्याचे स्पष्ट केल्याने चिंता करण्यासारखी स्थिती आहे. परंतु देशातील कोरोनाचा अभ्यास करणाऱ्या प्रयोगशाळांचा संघ ‘इन्साकॉग’ने मात्र डेल्टापेक्षा विषाणूंचा डेल्टा प्लस प्रकार कमी फैलावणारा असल्याचे सांगितले आहे.

डेल्टा प्लस हा अधिक फैलावणारा प्रकार असल्याची भीती व्यक्त केली जात होती. इन्साकॉगने ती दूर केली आहे. या संघाने नुकतेच एक अहवाल जारी केला आहे. त्यात एवाय१, एवाय२ ही डेल्टाची रूपे कमी फैलावणारी असल्याचे म्हटले आहे. यातील एवाय१ हा प्रकार डेल्टा प्लस मानला जातो. जून महिन्यात या संघाने केलेल्या विषाणूंच्या अभ्यासानुसार हे या दोन्ही प्रकाराने बाधित झालेले रुग्ण एक टक्क्यांहून कमी सापडले आहेत. त्यामुळे डेल्टा प्लस हा तिसरी लाट घेऊन येईल, अशी भीती आता अनाठायी ठरण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढूच नये, यासाठी मात्र अजूनही कोरोना विषयक नियमांचा कसोशीने पालन करावे लागणार आहे.

हेही वाचा: आरोग्यमंत्री बदलताच लशींचा पुरवठा मंदावला

इन्साकॉगने एवाय ३ या प्रकाराला डेल्टाचे नवे रुप मानले आहे. मात्र या बदललेल्या प्रकाराबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती या संघाला मिळालेली नाही. त्यावर तज्ज्ञ लक्ष ठेऊन आहेत. हा प्रकार मुख्यत्वे अमेरिका, ब्रिटन आणि भारतात आढळून आला आहे. डेल्टाचा रुप असलेले एवाय१ आणि एवाय २ हे प्रकार अमेरिका आणि ब्रिटनमधूनही घटताना दिसत आहेत. भारतातही या प्रकारामुळे बाधित झालेले रुग्ण हे एकूण रुग्ण संख्येच्या एक टक्क्यांहून कमी आढळले आहे. त्यामुळे हे प्रकार कमी फैलावणारे असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे.

जगभरातील १११ देशांत डेल्टा

भारतात अजूनही तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात असताना जागतिक आरोग्य संघटनेने मात्र जगात तिसरी लाट प्राथमिक टप्प्यात असल्याचे म्हटले आहे. देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मृतांचा आकडा याबद्दल चिंता व्यक्त करीत तिसरी लाट सुरू झाल्याचे संकेत संघटनेच्या प्रमुखांनी दिले आहेत. दुसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेला डेल्टा हा प्रकार १११ देशांमध्ये फैलावल्याचे त्यांनी म्हटले आहे

loading image