नवस पूर्ण न झाल्यामुळं संतापला तरुण; उचललं टोकाचं पाऊल

Demolition of idols of gods and goddesses in Delhi
Demolition of idols of gods and goddesses in DelhiDemolition of idols of gods and goddesses in Delhi

नवस पूर्ण न झाल्यामुळे देवावर संतापलेल्या तरुणाने मंदिरातील देवी-देवतांच्या (gods and goddesses) मूर्ती छिन्नी व हातोड्याने फोडल्या. या घटनेची माहिती मिळताच नोएडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला अटक (accused arrested) केली आहे. आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील आहे. विनोद ऊर्फ ​​भुरा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. (Demolition of idols of gods and goddesses in Delhi)

मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सदस्य आजारी असल्याने विनोद ऊर्फ ​​भुरा (रा. सी-१५३, सेक्टर-३७ पोलिस स्टेशन बीटा-२, गौतमबुद्धनगर) हा बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करीत होता. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आजारपणामुळे नातेवाईकाचा मृत्यू झाला. यामुळे चिडलेल्या भुराने रागाच्या भरात एका मंदिरातील देवतांची मूर्ती फोडली. धार्मिक स्थळावरील देवतांच्या मूर्तींची (Defamation of idols) नासधूस करून धार्मिक भावना दुखावणामुळे ग्रेटर नोएडाच्या बीटा-२ पोलिसांनी भुराला अटक केली आहे.

Demolition of idols of gods and goddesses in Delhi
इतिहासकार इरफान हबीब म्हणतात; ...तर लाल किल्ला-ताजमहाल तोडून बघा

पोलिसांनी आरोपीकडून घटनेत वापरलेला छिन्नी व हातोडाही जप्त केला आहे. २३ मे रोजी रात्री सेक्टर-३७ येथील मंदिरातील मूर्तींची (gods and goddesses) आरोपीने तोडफोड केली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बीटा-२ पोलिस ठाण्याने तत्काळ कारवाई करीत अवघ्या २४ तासांत ​​भुरा याला घटनेत वापरलेल्या छिन्नी-हातोड्यासह अटक (accused arrested) केली.

तीन वर्षांपासून करत होता प्रार्थना

कुटुंबातील सदस्य आजारी असल्याने देवाकडे बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती. सुमारे दोन ते तीन वर्षांपासून सतत प्रार्थना करीत होतो. मात्र, कुटुंबातील सदस्याला आजारापासून आराम मिळाला नाही. याच आजारपणामुळे त्यांच्या मृत्यू झाला. मृत्यूने नाराज झालेल्या छिन्नी व हातोड्याने मूर्तीची विटंबना (Defamation of idols) केली, असे आरोपीने पोलिसांना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com