Dengue: डेंग्यूच्या रुग्णाला प्लेटलेट्स ऐवजी चढवला मोसंबीचा रस; रुग्णाचा मृत्यू

या प्रकाराची राज्य प्रशासनानं गंभीर दखल घेतली असून रुग्णालय सील करण्यात आलं आहे.
Platlates
Platlates

प्रयागराज : डेंग्युच्या रुग्णाला प्लेटलेट्सऐवजी मोसंबीचा रस चढवल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये समोर आला आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यानुसार उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी या प्रकाराची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर संबंधीत रुग्णालय सील करण्यात आलं आहे. (dengue patient is given Mosambi juice instead of platelets patient death)

माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रयागराज येथील झलवा येथील ग्लोबल हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. या रुग्णालयात डेंग्यु झालेल्या रुग्णाला प्लेटलेट्स चढवण्यात आल्यानंतर दोन दिवसांनी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला. पण मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला की, प्लेटलेट्सऐवजी डॉक्टरांनी मोसंबीचा रस रुग्णाला चढवला. दुसरीकडं हॉस्पिटल प्रशासनानं हे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. रुग्णाला १६ ऑक्टोबर रोजी दुसरीकडं हालवण्यास सांगितलं होतं, त्यानंतर दोन दिवसांनी या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं हॉस्पिटलनं म्हटलं आहे.

Platlates
Mumbai : मुंबईत पंधरा दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू; जाणून घ्या कारण

बमरौली येथील रहिवासी प्रदीप पांडे यांना डेंग्यु झाल्यानं १४ ऑक्टोबर रोजी पीपल गावातील ग्लोबल हॉस्पिटल अँड ट्रॉमा सेंटरमध्ये भर्ती करण्यात आलं होतं. त्यानंतर १६ ऑक्टोबरला त्यांच्या रक्तातील प्लेटलेट्स १७ हजारांवर पोहोचल्या. त्यामुळं डॉक्टरांनी पाच युनिट प्लेटलेट्स चढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यादिवशी रात्री तीन युनिट प्लेटलेट्स चढवल्यानंतर रुग्णाची प्रकृती बिघडत गेली.

Platlates
HCL चे संस्थापक शिव नाडर हे भारतातील सर्वात मोठे देणगीदार

पण या प्रकरणात रुग्ण प्रदीप पांडे यांना प्लेटलेट्स ऐवजी मोसंबीचा रस चढवण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओवरुन उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देत रुग्णालय सील करण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com