
‘मला संबंध ठेवायला आवडत नाहीत’; पहिल्याच दिवशी पत्नीने केले स्पष्ट
मुलगा आणि मुलगी एकमेकांवर चार वर्षांपासून प्रेम करीत होते. प्रेमात आकंठ बुडाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांचा प्रचंड विरोध होता. तरीही त्यांनी लग्न केले. मात्र, सुहागरातच्या दिवशी पत्नीने शारीरिक संबंधास नकार दिला. ‘मला शारीरिक संबंध (physical relationship) ठेवायला आवडत नाहीत’ असे पतीला तिने स्पष्ट शब्दात सांगितले. हा प्रकार उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये घडला. (Denial of wifes physical relationship)
प्राप्त माहितीनुसार, मुरादाबाद येथील तरुणीचे सोनीपत येथील अभियंत्यासोबत प्रेमसंबंध होते. तरुणाचे मुरादाबादला नेहमी ये-जा असायची. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. सुमारे चार वर्षे दोघांचे प्रेमसंबंध सुरू होते. त्यांनी लग्नाची बाब ठेवली असता कुटुंबीयांनी नकार दिला. यामुळे तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याची धमकी (Suicide threat) कुटुंबीयांना दिली. तसेच मुलानेही घरच्यांवर दबाव टाकला. यानंतर दोघांनी लग्न केले.
हेही वाचा: अनुयायांना लघवी, विष्ठा देणाऱ्या बाबाच्या आश्रमात सापडले ११ मृतदेह
सुहागरातच्या दिवशी पत्नीने पतीला शारीरिक संबंध (physical relationship) ठेवायला आवडत नसल्याचे सांगितले. यामुळे पतीला धक्काच बसला. त्याने ही बाब कुटुंबीयांना सांगितली. या प्रकरणावर पंचायतीमार्फत तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यश मिळू शकले नाही.
यानंतर पतीने हे प्रकरण महिला उत्थान केंद्रापर्यंत पोहोचून समुपदेशन केले. नवविवाहित जोडप्याला एकत्र राहण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु, मुलीला पटले नाही. नंतर दोघांनी स्वेच्छेने वेगळे राहण्यास होकार दिला.
Web Title: Denial Of Wifes Physical Relationship Crime News Uttar Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..