गोयल दांपत्याला नाकारली देश सोडण्याची परवानगी

पीटीआय
शनिवार, 25 मे 2019

"जेट एअरवेज'चे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन ऍथॉरिटीकडून देश सोडण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई : "जेट एअरवेज'चे माजी अध्यक्ष नरेश गोयल व त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांना इमिग्रेशन ऍथॉरिटीकडून देश सोडण्याची परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोयल दांपत्य शनिवारी दुपारी मुंबई विमानतळावरून दुबईला जाण्यासाठी निघाले होते. हे विमान उड्डाण करणार इतक्‍यात अधिकाऱ्यांना इमिग्रेशन क्‍लीअरन्समध्ये त्रुटी आढळल्या. त्यामुळे या विमानाचे उड्डाण रोखण्यात आले. त्यानंतर गोयल दांपत्याला विमानातून खाली उतरविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

या वेळी अन्य एका प्रवाशाला प्रकृतीच्या कारणावरून प्रवास नाकारण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. दरम्यान, कंपनीने कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांपासूनचे वेतन थकविल्यामुळे गोयल दांपत्य, कंपनीचे संचालक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पासपोर्ट जप्त करावेत, अशी मागणी जेट एअरवेज ऑफिसर्स अँड स्टाफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण पावसकर यांनी गेल्या महिन्यात मुंबई पोलिस आयुक्तांकडे केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Denied permission to Goyal Couple for leave the country