Deputy Chairman Harivansh : उपाध्यक्षांनी फेटाळला धनकडांविरोधातील प्रस्ताव
Jagdeep Dhankhar : राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचा राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकड यांना पदावरून हटविण्याचा प्रस्ताव फेटाळला. विरोधकांनी या प्रस्तावात लोकशाही संस्थांचे रक्षण करण्यासाठी काही मुद्दे मांडले होते.
राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांना पदावरून हटविण्याचा विरोधकांच्या ‘इंडिया’आघाडीने मांडलेला प्रस्ताव आज नाकारण्यात आला. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी विरोधकांचा प्रस्ताव फेटाळून लावला.