Karnataka Politics : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना वेग, डी. के. शिवकुमार प्रमुख दावेदार; दिल्लीतून खलबते
D. K. Shivakumar : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी यांची नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यामुळे राज्यात नेतृत्व बदलाच्या अटकळींना वेग आला.
Congress Karnataka : पक्षांतर्गत सत्तावाटपाच्या ‘कराराच्या’ आधारे शिवकुमार मुख्यमंत्रिपदाची मागणी करत असल्याच्या वृत्तांदरम्यान ही बैठक झाली. प्रियांका गांधींसोबत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल शिवकुमार यांनी कोणतीही माहिती दिली नाही.