Purvanchal ExpressWay | मोदींचं विमान लँड झालेल्या 'पूर्वांचल एक्सप्रेसवे'ची खासियत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींचं विमान लँड झालेल्या 'पूर्वांचल एक्सप्रेसवे'ची खासियत

मोदींचं विमान लँड झालेल्या 'पूर्वांचल एक्सप्रेसवे'ची खासियत

उत्तर प्रदेशात 2022मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण गरम होत असतानाच सरकारने विकासकामांचाही धडाका लावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात 341 किलोमीटर लांबीच्या पूर्वांचल एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले.

महत्वाचं म्हणजे महामार्गाचं उद्घाटन करण्यासाठी मोदींनी त्यांचं विमान थेट एक्सप्रेस-वे वरच उतरवलं. उद्घाटन कार्यक्रमाच्या आधी नरेंद्र मोदी भारतीय वायु सेनेच्या एका C-130J या सुपर हर्क्युलस विमानातून आले. थेट एक्सप्रेसवेवर विमान उतरल्याने सध्या मोदींच्या या ब्रँडिंग फंड्याची चर्चा आहे. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत लढाऊ विमानांचे लँडिंग आणि टेक-ऑफ सुद्धा शक्य असल्याचं मोदींनी दाखवून दिलं.

'पूर्वांचल एक्सप्रेस-वे'बद्दल हे माहितीय का?

* पंतप्रधान मोदींनी आझमगडमध्ये पूर्वांचल एक्सप्रेस-वेची पायाभरणी केली होती.

*एक्सप्रेसवेमुळे प्रवाशांना दिल्लीहून बिहारच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशच्या सुदूर पूर्व पर्यंत 10 तासांहून कमी वेळात पोहोचता येईल.

* हा सहा लेनचा एक्स्प्रेस वे आहे, जो भविष्यात आठ लेनमध्ये वाढवला जाऊ शकतो.

* जवळपास 22,500 कोटी रुपये खर्चून बांधण्यात हा महामार्ग बांधण्यात आला आहे.

*सुलतानपूर जिल्ह्यातील कुरेभर जवळील अखलकिरी करवट गावात विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी एक्सप्रेसवेवर ३.२ किमी लांबीची हवाईपट्टी आहे.

* एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भाग, विशेषत: लखनौ, बाराबंकी, अमेठी, अयोध्या, सुलतानपूर, आंबेडकर नगर, आझमगड, मऊ आणि गाझीपूर जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना देणार आहे.

*लवकरच गंगा एक्सप्रेस-वेचे काम सुरू होणार आहे. गोरखपूर आणि बलिया लिंक रोडचं कामही काही वर्षांत पूर्ण होणार असल्याचं उत्तर प्रदेश सरकारने सांगितलं.

*एक्सप्रेस-वे लखनौ जिल्ह्यातील गोसाईगंज जवळील चांद सराय गावाला गाझीपूर जिल्ह्यातील NH-31 वरील हैदरिया गावाशी जोडतो. उत्तर प्रदेश एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरणाने (UPEIDA) हा हायवे विकसित केला आहे.

loading image
go to top