
सिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात रविवारी सकाळी दोन ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. बघेईगड गावात सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन नकरोड-चांजू मार्गावरील पूल वाहून गेला. त्याचप्रमाणे यामुळे आसपासच्या चार गावांचा शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, ढगफुटी आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे जीवित हानी झाल्याची अद्याप कोणताही नोंद झालेली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.