

Maheshwar to Get ‘Devi Ahilya Lok’, A New Hub for Spiritual Tourism
esakal
पुण्यश्लोक लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या 'गोदा ते नर्मदा' जलयात्रेचा भव्य समारोप महेश्वर (मध्य प्रदेश) येथे झाला. या सोहळ्याला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या सुशासन आणि जलव्यवस्थापनाच्या वारशाला वंदन केले. ही जलयात्रा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधील भातृत्व आणि सामायिक सांस्कृतिक वारशाचे प्रतीक ठरली आहे.