
प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावास्येनिमित्त बुधवारी (ता. २९) शाही स्नानासाठी जगभरातील भाविकांची पहाटेपासूनच मोठी गर्दी झाली. त्यामुळे कुंभमेळ्यापासून ७० किलोमीटर अलीकडेच भाविकांची वाहने थांबविण्यात आली. गर्दीवर नियंत्रण मिळताच भाविकांना पुढे सोडले जाईल, असे सांगितले जात होते.