Andaman Festival : लोणी काळभोरच्या देवयानी ननवरेने अंदमानमध्ये गाजवला नृत्यकलेचा ठसा; आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात प्रथम क्रमांक

Devayani Nanavare Wins First Prize at Andaman International Cultural Festival : लोणी काळभोरच्या देवयानी ननवरेने अंदमान येथील आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Devayani Nanavare Wins First Prize at Andaman International Cultural Festival

Devayani Nanavare Wins First Prize at Andaman International Cultural Festival

esakal

Updated on: 

लोणी काळभोर : अंदमान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात लोणी काळभोर येथील देवयानी शिवाजी ननवरे हिने नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आपल्या दमदार, देखण्या आणि आकर्षक नृत्य सादरीकरणाच्या जोरावर तिने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली. तिच्या या यशामुळे लोणी काळभोरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, ननवरे कुटुंबीयांसह परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...