

Madhya Pradesh News | CM Mohan Yadav | Administrative Action
esakal
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शुक्रवारी (२७ नोव्हेंबर २०२६) देवास येथे ‘मुख्यमंत्री जन विश्वास अभियाना’अंतर्गत आयोजित ‘समाधान ऑनलाइन’ कार्यक्रमात नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून घेतल्या. तक्रारींचे वेळेत निराकरण न करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. देवासचे उद्योग महाप्रबंधक रतन सिंह डावर यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले, तर लाडली लक्ष्मी योजनेच्या शिष्यवृत्ती प्रकरणात संबंधित पर्यवेक्षकाची एक वेतनवाढ रोखण्याचे निर्देश दिले.