
Ahmedabad Plan Crash: भारताच्या नागरी उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियामधील क्रू शेड्युलिंग आणि रोस्टरिंगशी संबंधित गंभीर चुकांची दखल घेतली आहे. या निष्काळजीपणासाठी जबाबदार असलेल्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या सर्व संबंधित जबाबदाऱ्यांमधून तातडीने हटवण्याचे निर्देश DGCA ने दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही अधिकारी ऑपरेशनल चुकांसाठी जबाबदार आढळले असून, त्यांना आता कोणत्याही क्रू व्यवस्थापन कामापासून दूर ठेवले जाईल.