तिकीटाची श्रेणी बदलल्यास विमान कंपनीला द्यावे लागणार इतके पैसे; DGCA चे नवे नियम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Airport

तिकीटाची श्रेणी बदलल्यास विमान कंपनीला द्यावे लागणार इतके पैसे; DGCA चे नवे नियम

DGCA News : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) बुधवारी CAR च्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे.

हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

एअरलाईन कंपनीकडून बोर्डिंगसाठी नकार, फ्लाइट रद्द केल्यास आणि विमानाच्या विलंब आदी कारणांमुळे फटका बसलेल्या प्रवाशांना या बदलाचा फायदा होणार आहे.

याशिवाय ज्या प्रवाशांनी त्याने खरेदी केलेल्या श्रेणीच्या तुलनेत सामान्य श्रेणीत बसवलेल्या प्रवाशांनाही या बदलाचा फायदा होणार आहे.

खरेदी केलेल्या तिकीटाशिवाय सामन्य श्रेणीत प्रवाशाला प्रवास करायला लावल्यास विमान कंपनीला देशांतर्गत करांसह ७५ टक्के परत करावी लागणार आहे.

तर, आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत 1500 किमी किंवा त्यापेक्षा कमी अंतराच्या तिकिटांसाठी 30% आणि 1500 ते 3500 किमी दरम्यानच्या तिकिटांसाठी 50% रक्कम परत करावी लागणार आहे.

हेही वाचा: Ramdas Athawale : 'ठाकरे-आंबेडकर युतीला शिवशक्ती-भीमशक्ती म्हणता येणार नाही'

प्रवाशांना परत देण्यात येणारी रक्कम ही सर्व समावेशक करांसह परत करावी लागणार आहे, याबाबत DGCA कडून सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :DGCA