
विमानात 18 दिवसात 8 वेळा तांत्रिक बिघाड, DGCA ची कंपनीला नोटीस
DGCA issues show cause notice to SpiceJet : स्पाइसजेटच्या विमानात सातत्याने बिघाड होण्याच्या घटनांनंतर बुधवारी कंट्रोलर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA ) ने स्पाइसजेट कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. गेल्या 18 दिवसांत तांत्रिक बिघाडाच्या आठ घटनांनंतर डीजीसीएने हे पाऊल उचलले आहे. DGCA द्वारे स्पाईसजेटच्या सप्टेंबर 2021 मधील ऑडिटमध्ये असे आढळून आले की, कंपनीकडून स्पेअर्स पुरवठादारांना नियमितपणे पैसे दिले जात नव्हते ज्यामुळे स्पेअरची कमतरता होती.
DGCA ने म्हटले आहे की, स्पाईसजेट विमान नियम, 1937 अंतर्गत सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा सुनिश्चित करण्यात अयशस्वी ठरली आहे. मंगळवारी दिल्ली-दुबई विमानाचे इंधन इंडिकेटर बिघडल्याने पाकिस्तानातील कराची येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. त्याच दिवशी कांडला-मुंबई विमान मुंबईत विंडशील्डच्या मध्यभागी तडा गेल्याने उतरवण्यात आले. मंगळवारी या दोन घटना समोर आल्यानंतर गेल्या 18 दिवसांत स्पाइसजेटच्या विमानातील तांत्रिक बिघाडाच्या ८ घटना समोर आल्या आहेत. डीजीसीएच्या म्हणण्यानुसार या सर्व घटनांची गांभीर्याने चौकशी सुरू आहे.
हेही वाचा: IASचा प्रताप! काळा पैसा पांढरा करण्यासाठी उभारलं हॉस्पिटल; ईडीच्या चार्जशीटमध्ये दावा
स्पाईसजेट एअरलाईन गेल्या तीन वर्षांपासून तोट्यात आहे. स्वस्त सेवा देणाऱ्या स्पाइसजेटला 2018-19 मध्ये 316 कोटी रुपये, 2019-2020 मध्ये 934 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 998 कोटी रुपयांचा तोटा झाला. विमान वाहतूक क्षेत्र कोरोना महामारीतून सावरत असताना विमान वाहतूक सल्लागार कंपनी CAPA ने 29 जून रोजी सांगितले की, भारतीय विमान कंपन्यांचा तोटा2021-22 मध्ये 3 अब्ज डॉलरवरून 2022-23 मध्ये 1.4 ते 1.7 अब्ज डॉलरपर्यंत खाली येऊ शकतो.
हेही वाचा: जगातील सर्वांत उंचावर असलेल्या post officeमध्ये आहे एकच पोस्ट मास्टर
Web Title: Dgca Sends Notice To Spicejet Airline Seeks Response On Eight Fault Incidents In Last 18 Days
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..