
Karnataka DGP Case: कर्नाटकचे माजी डीजीपी ओमप्रकाश यांच्या हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली आहे. बंगळूरु येथील राहत्या घरी रविवारी रात्री ओमप्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यांच्या शरीरावर धारदार हत्याराने केलेल्या जखमा होत्या. त्यांच्या पत्नीने खुनाचा गुन्हा कबूल करत म्हटलं होतं की, मी राक्षसाला मारुन टाकलं. पत्नीने दिलेल्या माहितीनुसार ओमप्रकाश यांच्या चेहऱ्यावर आधी मिरची पूड फेकली आणि त्यानंतर चाकूने वार करुन त्यांचा जीव घेतला.