Uttarakhand Governor: शेतकरी, आयुर्वेदिक डॉक्टर ते ४ वेळा आमदार अन् खासदार; कोण आहेत उत्तराखंडचे नवे राज्यपाल ?

Dhal Singh Bisen, Uttarakhand Governor, Political Journey : मध्य प्रदेशातील शेतकरी कुटुंबातून आलेले डॉ. ढाल सिंह बिसेन आज, १९ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या नवव्या राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत.
Dr. Dhal Singh Bisen, former Madhya Pradesh MP and cabinet minister, is set to take oath as the ninth Governor of Uttarakhand on October 19, 2026.

Dr. Dhal Singh Bisen, former Madhya Pradesh MP and cabinet minister, is set to take oath as the ninth Governor of Uttarakhand on October 19, 2026.

esakal

Updated on: 

मध्य प्रदेशचे माजी खासदार आणि माजी कॅबिनेट मंत्री डॉ. ढाल सिंह बिसेन आज, १९ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडच्या नवव्या राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत. डेहराडून येथील लोकभवन परिसरात सकाळी ११ वाजता शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. नैनिताल उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ देतील. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १२ ऑक्टोबर रोजी त्यांची उत्तराखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती.

डॉ. बिसेन रविवारी संध्याकाळी डेहराडूनमधील जॉलीग्रांट विमानतळावर दाखल झाले. त्या वेळी उत्तराखंड पोलिसांच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले. ते लेफ्टनंट जनरल (निवृत्त) गुरमीत सिंह यांची जागा घेणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com