

Dharmendra Pradhan paper leak protest 1997
esakal
आज देशभरात नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विरोधक राजीनाम्याची मागणी करत आहेत... विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत... आणि सोशल मीडियावर काही जुने फोटो आणि जवळपास ३० वर्षांपूर्वीचा एक किस्सा पुन्हा व्हायरल होत आहे. तेव्हा धर्मेंद्र प्रधान हे देशाचे शिक्षणमंत्री नव्हते... ते एक तरुण विद्यार्थी नेते होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे म्हणजेच एबीव्हीपीचे राष्ट्रीय सचिव म्हणून ते विद्यार्थी आंदोलनांमध्ये सक्रिय होते... असा दावा विविध अहवालांमध्ये करण्यात आला आहे...