धीरेंद्र महाराजांकडून तुकोबारायांबद्दलचं वादग्रस्त विधान अखेर मागे; म्हणाले...

Bageshwar Dham Dhirendra Shastri
Bageshwar Dham Dhirendra Shastriesakal

नवी दिल्ली : कथीत आध्यात्मिक गुरु धीरेंद्र महाराज यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. यामुळं देशभरात मोठा गदारोळ माजला होता, आध्यात्मिक क्षेत्रातील लोकांनीही यावरुन धीरेंद्र महाराजांना सुनावल्यानं अखेर त्यांनी नमत घेत आपलं हे विधान मागे घेतलं आहे. (Asaram Bapu Life Sentence for the second time need to know What is the matter)

Bageshwar Dham Dhirendra Shastri
Asaram Bapu Life Sentence: बलात्कार प्रकरणात आसारामला दुसऱ्यांदा जन्मठेप! काय आहे प्रकरण?

धीरेंद्र महाराजांनी म्हटलं की, "संत तुकाराम हे महान आहेत आमचे आदर्श आहेत. मी एका कथेमध्ये त्यांच्या पत्नीचा एक दाखला दिला होता. त्यांची पत्नी थोड्या विचित्र स्वभावाची होती, ही गोष्टी मी एका पुस्तकात वाचली होती. पण माझ्या या दाखल्यामुळं वारकरी पंथाच्या लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यासाठी मी त्यांना इतकचं सांगू इच्छितो की, त्यांनी आपल्या मनात कुठलीही कटुता ठेऊ नका, मी माझे शब्द मागे घेत आहे"

Bageshwar Dham Dhirendra Shastri
Asaram Bapu : बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

देहू संस्थाननं केला होता निषेध

"तुकाराम महाराजांनी अन्नप्राशन केल्याशिवाय त्यांची पत्नी जेवण करत नव्हती, हा खरा इतिहास आहे. त्यामुळं चुकीचा इतिहास पसरवू नका, तुम्हाला जर खरी माहिती घ्यायची असेल तर देहू मध्ये या आणि तुकाराम महाराजांची माहिती घ्या," अशा शब्दात देहू संस्थाननं धीरेंद्र महाराजांना सुनावलं होतं.

काय म्हणाले होते धीरेंद्र महाराज?

धीरेंद्र महाराजांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल बोलताना "त्यांची बायको त्यांना रोज मारायची, त्यामुळे ते देव देव करायला लागले," असं विधान केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com