esakal | Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले 
sakal

बोलून बातमी शोधा

people

कोरोनाचा संसर्ग पसरण्यास सुरवात झाली त्याच वेळी भारताने कडकडीत लॉकडाउनच्या अंमलबजावणीला सुरवात केली.लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला असून दर टप्प्यात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे

Lockdown : भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडण्याचे प्रमाण वाढले 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग पसरण्यास सुरवात झाली त्याच वेळी भारताने कडकडीत लॉकडाउनच्या अंमलबजावणीला सुरवात केली. आता या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला असून दर टप्प्यात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. गुगलच्या साह्याने केलेल्या एका पाहणीत हा प्रकार लक्षात आला आहे. भारतात प्रत्येक राज्यात घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वेगवेगळी आहे. त्या त्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती याला कारणीभूत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पाहणीत लक्षात आलेले मुद्दे 
- प्रत्येक टप्प्यात औषध दुकाने आणि किराणा दुकानांमध्ये जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ 
- पुरवठा साखळी कार्यरत केल्याने वाहतुकीत वाढ 
- दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात या रुग्णसंख्या अधिक असलेल्या राज्यांत बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी 
- छत्तीसगड, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश अशा कमी रुग्णसंख्या असलेल्या राज्यांत लॉकडाउन दोनच्या काळात बाहेर जाण्याचे प्रमाण वाढले 
- लॉकडाउन १ मध्ये उद्यानांमध्ये जाण्याच्या प्रमाणात फक्त ५० टक्केच घट 
- लॉकडाउन २ नंतर केरळ, मिझोराम सारख्या राज्यांत उद्यानांमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले 

४० टक्के : २५ मार्च ते १४ एप्रिल या काळात बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण 
५५ टक्के : १५ एप्रिल ते ५ मे या काळात बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण 

घरात बसण्याचे तास (लॉकडाउन आधी १०० तास) 
१२८ तास : देशातील सरासरी स्थिती 
१३२ तास : दिल्ली, महाराष्ट्र यासारख्या शहरी तोंडवळा असलेल्या राज्यांत 
११५ तास : बिहार, उत्तर प्रदेश यासारख्या ग्रामीण भागाचे प्राबल्य असलेल्या राज्यांत 

कार्यालये ओसच 
लॉकडाउन वाढत जात निर्बंध कमी होत गेले असले तरी खासगी कंपन्यामध्ये कर्मचारी येण्याचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून आले आहे. वर्क फ्रॉम होमची सोय असलेल्या ठिकाणी हे प्रमाण अत्यल्प आहे. लॉकडाउन २ नंतर कामावर जाणाऱ्यांचे प्रमाण दिल्लीत २ टक्के, गोव्यात १८ टक्के आणि केरळमध्ये ११ टक्क्यांनी वाढले.