Live In Relationship मधून बाहेर पडल्यावर महिलेचं एकटं राहणं अवघड - अलाहाबाद हायकोर्ट

न्यायालयाने असंही म्हटलं आहे की, अशा प्रकरणांमध्ये महिलेकडे आपल्या पार्टनरच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याशिवाय काही पर्याय राहत नाही.
Rape case news
Rape case newsesakal

Allahabad High Court: लिव्ह इन रिलेशनशीपमधून बाहेर पडल्यानंतर एका महिलेचं एकटं राहणं अवघड असतं, असं निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. भारतीय समाज अशा प्रकारच्या संबंधांना सहजासहजी स्वीकारत नाही, असंही उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

आपल्या विवाहित लिव्ह इन पार्टनरचा बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला जामीन देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. लिव्ह इन रिलेशनशीपमधून बाहेर पडल्यानंतर एका महिलेला एकटं राहणं अवघड असतं. कारण भारतीय समाज अजून अशा संबंधांना मोठ्या प्रमाणावर मान्यता देत नाही.

Rape case news
Shivsena : 'शिवसेना भवन दादर' नव्हे 'आनंद आश्रम ठाणे'; मुख्यालयाचा नवा पत्ता!

न्यायालयाने असंही म्हटलं आहे की, अशा प्रकरणांमध्ये महिलेकडे आपल्या पार्टनरच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याशिवाय काही पर्याय राहत नाही. आरोपी आदित्य राज वर्मा याच्या जामीन अर्जावर होणाऱ्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी करण्यात आली आहे. आदित्यला २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. त्याने आपल्या लिव्ह इन पार्टनरला लग्नाचं वचन दिलं होतं, पण नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला आहे.

Rape case news
Delhi News : रेल्वे रुळावर रिल्स बनवणं पडलं महागात; अवघ्या विशीत दोन तरुणांचा मृत्यू

या प्रकरणात पीडित महिला विवाहित आहे. तिचं म्हणणं आहे की आदित्य तिच्यासोबत गेल्या दीड वर्षांपासून राहत आहे आणि त्याच्यापासून ती गरोदरही आहे. मात्र आता आदित्यने आपल्याशी लग्न करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com