esakal | आता स्मार्टफोन वाचवू शकतो दंडात्मक कारवाईपासून!
sakal

बोलून बातमी शोधा

आता स्मार्टफोन वाचवू शकतो दंडात्मक कारवाईपासून!

वाहतुकीचे नियम मोडल्यास अनेकदा दंडात्मक कारवाई होते. तसेच जर आपल्याकडे वाहन संबंधित मूळ कागदपत्रे नसतील तर दंडाची रक्कम अधिकच असते.

आता स्मार्टफोन वाचवू शकतो दंडात्मक कारवाईपासून!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : वाहतुकीचे नियम मोडल्यास अनेकदा दंडात्मक कारवाई होते. तसेच जर आपल्याकडे वाहन संबंधित मूळ कागदपत्रे नसतील तर दंडाची रक्कम अधिकच असते. मात्र, आता यापासून सुटका होणार आहे. डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (M-PARIVAHAN APP) या दोन मोबाईल अॅपच्या माध्यमातून वाहनाशी संबंधित कागदपत्रे अपलोड करता येतील. विशेष म्हणजे ही कागदपत्रे ग्राह्यही धरली जातील.

एक सप्टेंबरपासून देशभरात वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्यास दंडाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. मात्र, डिजीलॉकर (DigiLocker), एमपरिवहन (M-PARIVAHAN APP) या दोन अॅपच्याद्वारे वाहनचालकांना याचा मोठा फायदा होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून वाहनाशी संबंधित कागदपत्रे अपलोड करता येतील. त्यासाठी आता मूळ कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही. परिणामी दंडात्मक कारवाईपासून सुटका होईल. 

अशी भरा माहिती

दंडात्मक कारवाईपासून वाचायचे असेल तर हे अॅप मोबाईल फोनमध्ये डाऊनलोड करणे गरजेचे आहे. तसेच मोबाईल नंबर रजिस्टर करुन आवश्यक माहिती त्यावर भरावी. त्यानंतर कागदपत्रे त्या अॅपच्या माध्यमातून डाऊनलोड करता येतील.

loading image
go to top