पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यातील कल्याणी येथील सत्र न्यायालयाने सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणात देशातील पहिली कठोर शिक्षा सुनावली आहे. 'डिजिटल अरेस्ट'च्या धमकीद्वारे राणाघाट येथील एका रहिवाशाकडून १ कोटी रुपये उकळणाऱ्या ९ फसव्या टोळीतील सदस्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील बिवास चटर्जी यांनी या गुन्ह्याला "आर्थिक दहशतवाद" संबोधून त्याची गंभीरता अधोरेखित केली. हा निर्णय सायबर फसवणुकीविरुद्ध लढण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल मानला जात आहे.