Viral Digital Didi: शिकवण्याची भन्नाट पद्धत! खाजगी शाळा सोडून पालकांची अंगणवाडीकडे रांग, डिजिटल दीदीच्या यूट्यूब चॅनेलला लाखो व्ह्यूज

Parasia-based anganwadi sevika Poonam Chaurasiya : सोशल मीडियावर 'डिजिटल दीदी' पूनम चौरसिया यांची हवा; खेळातून घडवतायत अंगणवाडीतील बालकांचे भविष्य
parasia wali poonam anganwadi

parasia wali poonam anganwadi

esakal

Updated on

सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता त्यातून लहान मुलांचे शिक्षण अधिक रंजक आणि सोपे करण्याचा अनोखा प्रयोग छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया भागातील अंगणवाडी सेविका पूनम चौरसिया यांनी केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे त्या परिसरात 'डिजिटल दीदी' म्हणून ओळखल्या जात आहेत.

पूनम चौरसिया यांनी '@parasiawalipoonam' या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अंगणवाडीतील मुलांना खेळ, कृती आणि स्थानिक वस्तूंच्या मदतीने शिकवण्याच्या पद्धती लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यांच्या चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, हजारो पालक आणि अंगणवाडी सेविका त्यांच्या उपक्रमातून प्रेरणा घेत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com