
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेची डिजिटल क्षेत्रात वेगाने घोडदौड सुरू असून कृषी आणि उत्पादन क्षेत्राखालोखाल सर्वाधिक रोजगार डिजिटल अर्थव्यवस्थेने तयार केले आहेत. २०२२-२३ मध्ये या रोजगारांचे प्रमाण १.५ कोटी एवढे होते, असा निष्कर्ष ‘स्टेट ऑफ इंडिया डिजिटल इकॉनॉमी रिपोर्ट २०२४’ अहवालात नोंदविण्यात आला आहे.