esakal | दिग्विजय सिंहाची नितीश कुमारांना ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

digviJAY SINGH AND NITISH KUMAR

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेता दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासंबंधी मोठं वक्तव्य केलंय.

दिग्विजय सिंहाची नितीश कुमारांना ऑफर; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेता दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासंबंधी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी नितीश कुमार यांना तेजस्वी यादव यांच्यासोबत येण्याची ऑफर दिलीये. पण, काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्यापासून फारकत घेतलीये. असे असले तरी दिग्विजय सिंह यांनी एका न्यूज चॅनलसोबत बोलताना नितीश कुमारांना विशेष आवाहन केले. ते म्हणाले तेजस्वी तर त्यांचे पुतणे आहेत. त्यांनी अनेकवेळा आपल्या काकाची मदत केली आहे, आता काकाने एकवेळ आपल्या पुतण्याची मदत करावी. 

दिग्विजय सिंह म्हणाले की, त्यांनी काँग्रेसला समर्थन द्या असं म्हटलं नाही. तुम्ही निकाल पाहिला तर एमआयएमआयएमला फायदा झाला, भाजपलाही फायदा झाला. काँग्रेस आणि आरजेडीला नुकसान झाले. लालू यादव आणि नितीश कुमार यांनी विद्यार्थी जीवनापासून राजनिती केलीये. तेजस्वी यादव त्यांचे पुतणे आहेत, त्यांनी काकांची अनेकवेळा मदत केली आहे. एकवेळ त्यांनीही पुतण्याची मदत करावी. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मोदींच्या विरोधात देश पातळीवर मजबूत आघाडीची गरज

तेजस्वी मुख्यमंत्री व्हावेत

दिग्विजय सिंह म्हणाले की, नितीश कुमार यांच्या मनासारखे जसे 2015 मध्ये झाले होते, तसे आताही होईल. फरक एवढाच असेल की तेजस्वी यादव मुख्यमंत्री व्हावे आणि नितीश कुमारांच्या मर्जीतला कोणी उपमुख्यमंत्री व्हावा. त्यांना स्वत:ला राज्यसभेवर घेतले जाईल. पुतण्या काकाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नव्हता का? काकाला आपल्या पुतण्याची आणखीन एकदा मदत करावया हवी. 

दिग्विजय सिंहाचे ट्विट

दिग्विजय सिंह यांनी ट्निव करुन म्हटलं होतं की, नितीशजी बिहार तुमच्यासाठी छोटा झाला आहे, तुम्ही केंद्रातील राजकारणात या. सर्व समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारधारांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत की, आरएसएसने इंग्रजांनी अवलंबलेली 'फूट पाडा आणि राज्य करा' निती वाढू नये. यावर नक्की विचार करा. महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्यासाठी ही खरी श्रद्धांजली असेल. तुम्ही त्यांच्याच वारशातून निघालेले नेता आहात. त्यामुळे देशाला वाचवणे तुमचे कर्तव्य आहे. दरम्यान, दिग्विजय सिंह यांचा हा वैयक्तिक विचार आहे आणि पक्षाशी त्याचे काही देणेघेणे नाही, असं काँग्रेसने म्हटलंय. बिहार निवडणूक