

Dilip Puri Death Case
sakal
मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात अवैध दारू तस्करी रोखण्याच्या प्रयत्नात मृत्यू झालेल्या खातेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप पुरी यांच्या प्रकरणातील मुख्य आरोपीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. आयशर वाहनाचा चालक गजेंद्र ऊर्फ अक्कू याने पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर बरोठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यासोबत चकमक झाली. या कारवाईत आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.